शासनमान्य ग्रंथ निवड यादीसाठी ग्रंथ सादर करण्याचे आवाहन

 


 

 छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका)- राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान,  कोलकाता व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने समान निधी ' ग्रंथभेट ' योजने अंतर्गत सन २०२५या कॅलेंडर वर्षात प्रकाशित झालेली मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील ग्रंथ खरेदी करुन राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांना भेट म्हणून देण्यात येतात.

            या योजनेअंतर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या ग्रंथाची निवड करण्यासाठी तसेच ग्रंथालय संचालनालय स्तरावरुन प्रसिध्द  होणाऱ्या  ‘शासनमान्य ग्रंथ निवड यादी’ मध्ये समावेश होण्याच्या दृष्टीने सन २०२५ या कॅलेंडर वर्षात ( दि. १ जानेवारी २०२५ ते दि.३१ डिसेंबर २०२५) प्रकाशित झालेल्या व प्रथम आवृत्ती असलेल्या ग्रंथांची प्रत्येकी एक विनामुल्य प्रत  (Complimentary copy) ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे दिनांक २८ फेब्रुवारी पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर प्राप्त ग्रंथांचा ग्रंथ निवड यादीसाठी विचार केला जाणार नाही. या यापूर्वी संचालनालयास पाठविले असल्यास पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नाही.

          तसेच, मुद्रण व नोंदणी अधिनियम, १८६७ अन्वये मुद्रकाने व ग्रंथ प्रदान अधिनियम, १९५४ अन्वये प्रकाशकाने सदर ग्रंथाची प्रत्येकी एक प्रत राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, नगर भवन, मुंबई, शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे व शासकीय विभागीय ग्रंथालय, नागपूर येथे पाठविणे आवश्यक आहे. ग्रंथ पोहोचल्याची पोच पावती संबंधीत ग्रंथालयाकडून घ्यावी. ग्रंथालय संचालनालयास संबंधित ग्रंथ पाठवितांना वरीलप्रमाणे ग्रंथ पाठविल्याची पोच पावती ग्रंथासोबत टपालामार्फत वा समक्ष पाठविण्यात यावी.  सर्व लेखक, प्रकाशक यांनी ग्रंथ पाठवावे असे आवाहन ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा