हुतात्मा दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात मौन पाळून आदरांजली

 




छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका)- देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयात दोन मिनीटे मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली. जिल्हा नियोजन सभागृहात सकाळी ११ ते ११ वा. २ मि. पर्यंत उपस्थित सर्व अधिकारी- कर्मचारी यांनी मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा