मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्याचे आवाहन

   छत्रपती संभाजीनगर, दि. 29 (जिमाका) – इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती तसेच शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत जानेवारी अखेरपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

            विभागामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांकडून आतापर्यंत एकूण 43 हजार 507 विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 28 हजार 878 अर्ज महाविद्यालयांनी मंजुरीसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडे पाठविले आहेत.

            तसेच 12 हजार 648 अर्ज महाविद्यालयाच्या लॉगिनमधून मंजुरीसाठी छाननीच्या प्रक्रियेत असून, 1 हजार 872 अर्जांमध्ये आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असल्याने संबंधित महाविद्यालयांनी त्रुटी पूर्ततेसाठी विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये सेन्डबॅक केले आहेत. याशिवाय चुकीच्या योजनेची निवड केल्यामुळे 93 अर्ज नामंजूर करण्यात आले असून, 16 विद्यार्थ्यांनी ‘राईट टू गिव्ह अप’ केले आहे.

            या पार्श्वभूमीवर, मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले तसेच अपूर्ण कागदपत्रांमुळे अडलेले अर्ज तात्काळ दुरुस्त करून परिपूर्ण स्वरूपात सादर करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक दयानंद कोकरे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा