मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तकांचे दान वाचन चळवळीला बळकटी देण्यासाठी ‘बुक बॅंक’ उपक्रम- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 







छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका)- जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी बुक बॅंक हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. त्याद्वारे वाचन चळवळीलाही बळकटी मिळेल,असा विश्वास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज व्यक्त केला.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज जिल्हा परिषदेतील शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘बुक बॅंक’ उपक्रमांतर्गत १००० पुस्तकांचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून बुक बॅंक हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी महसूल अधिकारी- कर्मचारी यांनी स्वतःच्या देणगीतून १००० पुस्तके खरेदी करुन आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण व आश्विनी लाटकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, नीलम बाफना, लतिफ पठाण तसेच अन्य महसूल अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

प्रास्ताविक जयश्री चव्हाण यांनी केले. आभार संगिता गायकवाड यांनी मानले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा