बार्टी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण
छत्रपती
संभाजीनगर, दि.२५(जिमाका)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था
(बार्टी) पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने की अनुसूचित
जाती प्रवर्गातील युवक व युवतींसाठी निवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले आहे.
प्रशिक्षणा
दरम्यान संबंधित विषयाचे प्रात्यक्षिकासह तांत्रिक ज्ञान व उद्योजकीय ज्ञान देण्यात
येईल. उद्योग उभारणी, शासकीय कर्ज /अनुदान योजनांची माहिती, प्रकल्प अहवाल, विक्री
कला, उद्योग व्यवस्थापन, उद्योगांना भेटी, कर कायदा, लायसन्स याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे
प्रशिक्षण दिले जाईल.
प्रशिक्षणार्थ्यांची
निवड प्रवेश मुलाखती द्वारे केली जाणार आहे. प्रशिक्षणार्थी हा वय वर्षे १८ ते ४५ वयोगटातील
असावा, अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा, एक महिना कालावधीच्या प्रशिक्षणासाठी किमान
शैक्षणिक पात्रता इयत्ता १० वी उत्तीर्ण व दोन महिने कालावधीच्या प्रशिक्षणासाठी किमान
पदवीधर (Engineering, Polytechnic, MCA, BCA, MSC, BSC यांना प्राधान्य). गत पंधरा
वर्षांपासून महाराष्ट्राचा रहिवासी असावा तसेच स्वतःचा स्वयंरोजगार/रोजगार करण्याची
तयारी असावी. प्रवेश अर्जासोबत आधार कार्ड, फोटो, स्वतःचा जातीचा दाखला, अंतिम सत्र
गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला जोडणे आवश्यक आहे.
इच्छुक
प्रशिक्षणार्थ्यांनी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED), जिल्हा कार्यालय, अ-३८,
MIDC रेल्वे स्टेशन परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे भारती सोसे, प्रकल्प अधिकारी
MCED, मो. 9168667122 किंवा कार्यक्रम आयोजक MCED, मो. 7620445510, मो. 8421344654
यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय अधिकारी सुभाष थोटे व प्रकल्प अधिकारी
योगेश सोनवणे, (BARTI) यांनी केले आहे.
०००००

Comments
Post a Comment