जेईई,नीट,सीईटी परीक्षेसाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

 

 


छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका)- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येत असलेल्या छत्रपती संभाजीनगर/ जालना, लातूर /बीड अंतर्ग येत असलेल्या सर्व शासकीय / अनुदानित आश्रमशाळांमध्ये इयत्ता १० वी ते १२ वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जेईई, नीट, सीईटी या परीक्षांची पूर्वतयारी करण्यासाठी नामवंत प्रशिक्षण संस्थांमध्ये मार्गदर्शन दिले जाणार आहे. त्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज भरुन द्यावे असे आवाहन प्रकल्प अधिकारी चेतना मोर्रे यांनी केले आहे.

सर्व शासकीय, अनुदानित आश्रमशाळा तसेच EMRS / मराठी माध्य शाळा / जिल्हा परिषद/ नगरपालिका व महानगर पालिकांमधील माध्यमिक शाळां मध्ये इयत्ता १० वी नंतर ११ वी व १२ वी मध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना २ वर्ष कालावधी मध्ये नामवंत खाजगी प्रशिक्षण संस्थेच्या साहाय्याने अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परिक्षेची पूर्व तयारी करून घेणेकरिता प्रशिक्षण कार्यक्रम राबविल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा आय. टी. आय. मधील अभ्यासक्रमा च्या प्रवेशा करीता (JEE/NEET/CET) जास्तीत जास्त अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी परिक्षेसाठी पात्र राहतील. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर /जालना /लातूर/बीड अंतर्गत येत असलेल्या शासकीय अनुदानित आश्रमशाळा/EMRS / मराठी माध्य शाळा / जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र भरून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर येथे सादर करावे. विहीत नमुन्यातील आवेदनपत्र शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचे कडे विनामुल्य उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांची आवेदनपत्र लवकरात लवकर प्रकल्प कार्यालयाकडे / मुख्याध्यापकांमार्फत सादर करावे असे आवाहन अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा