महिला वाहन चालक प्रशिक्षक प्रशिक्षण

 


छत्रपती संभाजीनगर, दि.२६(जिमाका)- महिलांच्या सामाजिक आर्थिक सक्षमीकरणासाठी आवश्यक कौशल्य प्राप्त व्हावे यासाठी महिलांना टॅक्सी, बस चालक प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. वाहन चालन प्रशिक्षण व संशोधन संस्था पुणे यांच्यातर्फे ब्रिजस्टोन इंडीया संस्थेच्या सहकार्याने १० महिलांसाठी ३० दिवसांचे अनिवासी विशेष वाहन प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम दि.२८ रोजी सुरु होणार आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांचा अभ्यासक्रम थेअरी व प्रॅक्टीकल असे प्रशिक्षणाचे स्वरुप आहे.प्रशिक्षणाचा पत्ता हॉटेल कलासागर, स्टेट बॅंक ऑफ इंडीयाच्यापुढे, पुणे मुंबई महामार्ग, कासारवाडी, पुणे ४११०३४.

जिल्ह्यातील इच्छुक महिलांनी संपर्क करावा,असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी केले आहे.

आवश्यक पात्रताः- किमान २ वर्षे जुने लहान व मोठी चारचाकी वाहने चालविण्याचा परवाना, किमान १० वी पास किंवा आयटीआय, इंजिनिअरिंग पदविका, मेकॅनिकल इंजिनिअरींग पदवी असल्यास प्राधान्य.

०००००

Comments

Popular posts from this blog

रोजगार महाकुंभ दि.२९ रोजी; जिल्ह्यात २१ ठिकाणी भरती मेळावे

छत्रपती संभाजीनगर विभागात दि.२९ रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ

गणेशोत्सवातील उत्कृष्ट सार्वजनिक मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा