मराठी भाषा गौरव दिन ते महिला दिन; शासकीय महिला अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी स्पर्धा
छत्रपती
संभाजीनगर, दि.२६(जिमाका)- मराठी भाषा गौरव दिन (दि.२७ फेब्रुवारी) ते आंतरराष्ट्रीय
महिला दिन (दि.८ मार्च) चे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय व शिक्षण विभाग यांच्या
संयुक्त विद्यमाने महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात
आले आहे. या स्पर्धात अधिकाधिक महिला अधिकारी- कर्मचारी यांनी सहभागी व्हावे,असे आवाहन
करण्यात आले आहे.
या सप्ताहात ऑनलाइन निबंध स्पर्धा, चारोळी/घोषवाक्य लेखन,
स्लोगन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, प्रत्यक्ष स्वरुपात कविसंमेलन, रांगोळी स्पर्धा,फॅन्सी
ड्रेस,रँपवॉक,अन्नपूर्णा स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले
आहे.
१) निबंध स्पर्धा
(ऑनलाइन – ०२/०३/२०२६)-
मी कर्तृत्ववान – कर्तृत्वाचा प्रवास
माझ्या
जीवनातील प्रेरणादायी स्त्री पात्र
कामकाजात
मराठी भाषेचे महत्त्व
मराठी
भाषा आणि संस्कृती
२) चारोळी / घोषवाक्य स्पर्धा (०३/०३/२०२६)
स्त्री शक्ती, आत्मविश्वास व समानता
मराठी भाषेचा अभिमान
३) स्लोगन स्पर्धा (०४/०३/२०२६)
“माझी भाषा – माझा अभिमान”
“स्त्री सक्षमीकरण – समाजाचा विकास”
४) चित्रकला स्पर्धा (०५/०३/२०२६)
महिला सन्मान व समानतेची जाणीव
मराठी संस्कृती आणि परंपरा
५) प्रत्यक्ष कार्यक्रम (०६ व ०७ मार्च २०२६)
कविसंमेलन
रांगोळी स्पर्धा
फॕन्सी ड्रेस
रॅंपवॉक
अन्नपूर्णा डिश स्पर्धा
सांस्कृतिक सादरीकरण
जिल्ह्यातील सर्व महिला अधिकारी, महिला कर्मचारी, महिला शिक्षिका
तसेच शिक्षण विभागातील सर्व महिला कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून हा
सप्ताह यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सहभाग नोंदणी
सर्व स्पर्धांसाठी ऑनलाइन नोंदणी लिंक उपलब्ध आहे. त्यावरुन
सहभाग नोंदवावा,असे कळविण्यात आले आहे.
०००००
Comments
Post a Comment