जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवड; गुरुवारी (दि.२ एप्रिल) विशेष सभा

 छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका)- जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवड करण्यासाठी  गुरुवार दि.२ एप्रिल रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात दुपारी २ वा. होणार आहे. निवड प्रक्रिया सकाळि १० वा. पासून सुरु होणार आहे,असे या सभेचे पिठासीन अधिकारी संतोष गोरड यांनी कळविले आहे.

            पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कन्नड संतोष गोरड यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार दि.२ एप्रिल रोज ही विशेष सभा जिल्हाधिकारी कार्यलयातील नियोजन सभागृहात होणार आहे.

            या विशेष सभेचा कार्यक्रम याप्रमाणे- गुरुवार दि.२ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ या वेळात नामनिर्देशन स्विकारणे, दुपारी २ वा. विशेष सभेस सुरुवात. प्रथम प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी, त्यानंतर नामनिर्देशन माघारीसाठी वेळ दिला जाईल. त्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी मराठी वर्णक्रमानुसार करण्यात येईल. त्यानंतर समिती सभापती निवडणूकीसाठी एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास  हात वर करुन मतदान घेण्यात येईल.

            या विशेष सभेसाठी उपस्थित राहण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती सभापती यांना कळविण्यात आले आहे. तथापि, सभापतींना अध्यक्ष/ उपाध्यक्ष निवडीसाठी मतदान करता येणार नाही. हात वर करुन मतदान करणाऱ्या सदस्याची स्वाक्षरी घेऊन  नोंद घेण्यात येईल. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येईल. या सभेसाठी नवनिर्वाचित  एकूण ६३ जिल्हा परिषद सदस्य व ९ पंचायत समिती सभापती यांना बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे,असेही पिठासीन अधिकारी संतोष गोरड यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा