महाराष्ट्र दिन; जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

 








छत्रपती संभाजीनगर, दि १(जिमाका)- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस दलाने राष्ट्र्ध्वजास मानवंदना दिली.

अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकूणे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) संगीता राठोड, उपजिल्हाधिकारी (राजशिष्टाचार) संगीता सानप, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रुपेश शिंगारे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, अपर तहसीलदार उमेश पाटील, तहसीलदार पल्लवी लिगदे, रूपा चित्रक यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी यांनी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना भेटून  शुभेच्छा दिल्या.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा