सर्वोच्च न्यायालयात विशेष लोकअदालत; ३१ मे पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत

 


 

छत्रपती संभाजीनगर,दि.२९(जिमाका)- सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी दि.२१, २२ व २३ ऑगस्ट रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षकारांनी आपली सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यासाठी दि.३१ मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा,असे आवाहन करण्यात आले आहे. या विशेष लोकअदालतीचा उद्देश सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा संमती आधारीत निराकरण प्रक्रियेद्वारे सलोख्याने निपटारा करणे हा आहे. त्यासाठी पक्षकार, वकील ह्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. https://forms.gle/iqxefqF4BCWzukoP6 या गुगल लिंकवर अर्ज भरता येणार आहे. तसेच https://www.sci.gov.in या संकेतस्थळावरुनही अर्ज भरता येणार आहे. या लोकअदालतीत पक्षकारांना आभासी पद्धतीने उपस्थित राहण्याची सुविधा देण्यात आली आहे. दि.३१ मे पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. या विशेष लोकअदालतीत सहभाग घेण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गिरीश अग्रवाल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती वैशाली फडणीस यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा