प्राचीन हस्तलिखिते, दस्तऐवजांची माहिती नोंदविण्याचे आवाहन

 

छत्रपती संभाजीनगर,दि.२६(जिमाका)- प्राचीन ज्यांचा कालावधी ७५ वर्षांपेक्षा अधिक जुना आहे अशा कालावधीतील हस्तलिखिते, पत्र, पोथ्या, दस्तऐवज आदींची माहिती डिजीटल स्वरुपात ज्ञानभारतम या पोर्टल किंवा ॲपवर नोंदवावी असे आवाहन धर्मादाय उपायुक्त यु.एस. पाटील यांनी केले आहे.सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे नोंदविण्यात आलेल्या सार्वजनिक न्यास तसेच इतर नागरिक यांच्याकडे अशाप्रकारे ७५ वर्षांपेक्षा अधिक जुने हस्तलिखिते, पत्र, पोथ्या आदी दस्तऐवज यांची डिजीटल स्वरुपात ज्ञानभारतम पोर्टल, ॲप वर नोंद करावी व सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयास त्याची माहिती कळवावी,असे आवाहनही करण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा