शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरु

 छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका)- अनुसूचित जाती, जमाती, विजाभज, इमाव, आर्थिक मागास प्रवर्गातील इयत्ता ११ वी, १२ वी व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरु झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org  या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावे. त्यासाठी ३० जून २०२६ ही अंतिम मुदत असून बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी दि.१५ जुलै २०२६ ही मुदत आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरुन त्याची प्रिंट १००० मुलांचे शासकीय वसतीगृह , किले अर्क, छत्रपती संभाजीनगर आणि विद्यार्थिनींनी आपले अर्ज गुणवंत मुलींचे शासकीय वसतीगृह, पदमपुरा येथे सादर करावे. बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे अर्ज मुलींचे शासकिय वसतिगृह(जुने), गारखेडा परिसर येथे जमा करावे. तालुकास्तरावरील विद्यार्थ्यांनी आपले अर्ज तालुकास्तरावरील वसतीगृहात जमा करावे,असे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा