तंबाखू विरोधी दिनानिमित्त रविवारी (दि.३१) विविध कार्यक्रम
छत्रपती संभाजीनगर,
दि.२६(जिमाका)-
जागतिक तंबाखू विरोधी दिन रविवार दि.३१ मे रोजी नियोजीत आहे.यानिमित्त जिल्हास्तरावर
विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर
यांनी कळविले आहे.यानिमित्त विविध जनजागृती उपक्रमांना दि.१ मे पासून सुरुवात करण्यात आली आहे. तथापि,
तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती, विविध स्पर्धांमधून जनजागृती, ग्रामस्तरावर
बैठकांमधून चर्चासत्रे, मौखीक आरोग्य तपासणी, जिल्ह्यातील सर्व कार्यालये तंबाखूमुक्त
घोषीत करणे आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. दि.३१ रोजी तंबाखू मुक्तीची शपथ घेऊन या
दिवसाची सांगता करण्यात येणार आहे. यासंदर्भात १८००११२३५६ या टोल फ्री क्रमांकवर अधिक
माहिती व समुपदेशन उपलब्ध आहे,असे जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ. मुदखेडकर यांनी कळविले
आहे.
०००००
Comments
Post a Comment