प्राण्यांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी चेकपोस्टवर भरारी पथकांनी तपासणी करावी-जिल्हाधिकारी विनय गौडा जी .सी कत्तलखान्यास भेट देऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर दि,२६ (जिमाका) प्राण्यांचे अवैध वाहतूक रोखण्यासाठी शहरी आणि ग्रामीण
भागात चेकपोस्ट तयार करावेत ,या चेक पोस्टवर भरारी पथकाद्वारे तपासणी करण्याचे निर्देश
जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यांनी दिले.
पोलीस विभाग, पशुसंवर्धन, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, परिवहन, महसूल आणि महानगरपालिका
विभागाच्या अधिकारी यांच्यामार्फत संयुक्त कार्यवाही करावी, तसेच शासन मान्यताप्राप्त
कत्तलखान्यामध्ये अचानक भेट देऊन तेथील कामकाज, स्वच्छता व इतर बाबी विषयी अहवाल
सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले
जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जिल्हा
प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती’च्या
(SPCA) आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस
मा.न्यायधीश( परिविक्षाधीन) गायत्री रांझे, जिल्हा
पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नानासाहेब कदम अतिरिक्त पोलिस आयुक्त, अशोक राजपूत, पोलीस
निरीक्षक, एस. व्ही शहाणे ,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजकुमार कुंथले, उप शिक्षणाधिकारी
श्रीमती गीता तांदळे, डॉ .रमण इंगळे,
सहायक आयुक्त पशुसंवर्धन
डॉ.अहेमद असरार,सहायक आयुक्त पशुसंवर्धन
,डॉ. शाहेद ,मुख्य पशुसंवर्धन अधिकारी महानगर पालिका
डॉ. ज्ञानेश्वर बिडाईत सहायक पशुधन
विकास अधिकारी जिल्हा परिषद,डॉ जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी महानगर पालिका यांची उपस्थिती
होती.
बाजाराच्या ठिकाणी किंवा इतरत्र होणारी प्राण्यांची
अवैध केलेली वाहतूक पूर्णपणे रोखण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस तपासणी नाके (Check
posts) अधिक सतर्क करण्यात यावीत.
शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांबद्दल
संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी वनविभाग व प्राणी मित्र संघटनांच्या माध्यमातून विशेष
जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले.
प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याची
जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस, महसूल, पशुसंवर्धन विभाग आणि स्वयंसेवी
संस्थांनी (NGOs) समन्वय ठेवून काम करावे, असे आवाहन करण्यात आले.
00000


Comments
Post a Comment