कामगार कल्याण मंडळाचा ७३ व्या वर्धापन दिनःबुधवारी (दि.१ जुलै) संगीत रजनी
छत्रपती संभाजीनगर,
दि.२९(जिमाका)-
कामगार कल्याण मंडळाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या छत्रपती संभाजीनगर
विभागीय कार्यालयाच्या वतीने बुधवार दि.१ जुलै रोजी स्वागत समारंभ, संगीत रजनी अशा भरगच्च कार्यक्रमांचे
आयोजन ललित कला भवन उस्मानपुरा येथे करण्यात आले आहे.
याप्रसंगी निर्माता, गायक तथा संगीतकार मंगलसिंग सोळंके प्रस्तुत
स्वरधारा हा सुमधुर मराठी हिंदी गीतांच्या संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
आहे.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हे कामगार व कामगार कुटुंबीयांचा
सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकासाचे उद्दिष्ट्य ठेवून विविध कल्याणकारी योजना व उपक्रमांच्या
माध्यमातून कामगार व कामगार कुटुंबियांच्या उत्कर्ष करण्यासाठी कार्यरत आहे. यासाठी
शिष्यवृत्ती( सर्वसाधारण, क्रीडा, परदेशी), पाठ्यपुस्तक- एम एस सी आय टी - टायपिंग
- चारचाकी वाहन चालक अर्थसहाय्यता योजना, गंभीर आजार वैद्यकीय अर्थसहाय्यता योजना,
इत्यादी योजना तसेच औद्योगिक व व्यावसायिक कामगारांची नाट्यस्पर्धा, कामगार नाट्य महोत्सव,
बालनाट्य-महिला नाट्यस्पर्धा, समरगीत स्पर्धा, कामगार भजन स्पर्धा, महिला भजन स्पर्धा
, कामगार भजन प्रशिक्षण शिबिर, कामगार केसरी कुमार केसरी कुस्ती स्पर्धा, औद्योगिक
व व्यावसायिक कामगारांची कबड्डी व महिलांसाठी खुली कबड्डी स्पर्धा आदी स्पर्धांच्या
माध्यमातून तसेच शिशुमंदिर, शिवणवर्ग, ग्रंथालय, अभ्यासिका, आदी उपक्रमांच्या माध्यमातून
तसेच विविध प्रकारचे रोजगार स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम आदींच्या द्वारे कामगारांकरिता
कल्याणकारी कार्य करत आहे.
कामगार कल्याण मंडळाच्या ७३ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने
आयोजित स्वागत समारंभ व संगीत रजनी कार्यक्रमास कामगार व नागरिकांनी उपस्थित रहावे
असे आवाहन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे मराठवाडा विभागीय सहा. कल्याण आयुक्त भालचंद्र
जगदाळे यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment