*वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन*
छत्रपती संभाजीनगर,
दि.२९( जिमाका)-वसंतराव
नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या,
२५% बीजभांडवल कर्ज योजना, एक लाख रुपये थेट
कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना,या कल्याणकारी
योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री. एस. आर. बडगुजर यांनी केले आहे.
या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनी https://www.vnvjntdc.org/ या
अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे
केले आले आहे.
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या
जमाती विकास महामंडळ आणि त्यांच्या अधिपत्याखालील उपकंपन्या, ज्यामध्ये राजे उमाजी
नाईक आर्थिक विकास महामंडळ, पैलवान कै. मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ, श्रीकृष्ण
आर्थिक विकास महामंडळ, ब्रम्हलिन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ,
विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ आणि श्री. शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास
महामंडळ यांचा समावेश आहे, त्यांच्यामार्फत विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. यामध्ये
प्रामुख्याने २५% बीज भांडवल कर्ज योजना, १.०० लाख रुपयांपर्यंतची थेट कर्ज योजना,
तसेच वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनांचा समावेश आहे.
योजनांचे स्वरूप:
२५% बीज भांडवल कर्ज या योजनेत बँकेचा सहभाग ७५% तर महामंडळाचा सहभाग
२५% आहे. यावर ४% व्याजदर असून परतफेडीचा कालावधी ५ वर्षे आहे.
थेट कर्ज योजना (१ लाख) या योजनेअंतर्गत
महामंडळामार्फत पूर्ण कर्ज दिले जाते. लाभार्थीने ४८ समान मासिक हप्त्यांमध्ये (रु.
२०८५ प्रति हप्ता) कर्जाची परतफेड केल्यास, त्यांना कोणतेही व्याज भरावे लागणार नाही.
मात्र, हप्ते थकीत राहिल्यास ४% दराने व्याज आकारले जाईल.व्याज परतावा योजना: या योजनेत
कर्ज बँकेचे असून, लाभार्थ्यांनी वेळेवर हप्ते भरल्यास १२% पर्यंतचे व्याज महामंडळाकडून
लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.
इच्छुक लाभार्थ्यांनी अधिक माहितीसाठी
जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तिसरा मजला, न्यू शिवाजी
हायस्कूल जवळ, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर ४३१००१ येथे संपर्क साधावा. तसेच, अधिक
माहितीसाठी कार्यालयाच्या ०२४०-२९९१८५३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे
जिल्हा व्यवस्थापक श्री. एस. आर. बडगुजर यांनी कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment