प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार ; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 


छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)-केंद्र शासनातर्फे दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठित 'प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार - २०२६ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना गौरवण्यासाठी केंद्र सरकारने पात्र बालकांकडून किंवा त्यांच्या वतीने संस्थांकडून नामनिर्देशन (Nominations) मागविले आहेत. यासाठी https://awards.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ३१ जुलै २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत.

राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवणाऱ्या बालकांना प्रदान केला जातो.यात शौर्य,क्रीडा,समाजसेवा,विज्ञान आणि तंत्रज्ञान,पर्यावरण,कला आणि संस्कृती,नवोन्मेष (Innovation)याचा समावेश आहे.

अर्ज करण्यासाठी  बालकाचे वय ५ वर्षांपेक्षा जास्त आणि ३१ जुलै २०२६ रोजी १८ वर्षांपेक्षा कमी असावे. अर्ज केवळ*https://awards.gov.in* या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.

स्वतः बालक, पालक, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश प्रशासन, जिल्हाधिकारी, पंचायती राज संस्था, नागरी स्वराज्य संस्था किंवा शैक्षणिक संस्था संबंधित बालकाचे नाव पुरस्कारासाठी सुचवू शकतात.

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ३१ जुलै २०२६ ही आहे.

जिल्ह्यातील ज्या बालकांनी शिक्षण, कला, क्रीडा किंवा सामाजिक कार्यात विशेष नैपुण्य मिळवले आहे, त्यांच्या पालकांना आणि संबंधित संस्थांना विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी संबंधितांनी वरील संकेतस्थळाला भेट द्यावी. असे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, कोमल कोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा