मुख्य अभियंता मृद व जलसंधारण यांचे कार्यालय गुरुवार (दि.२) पासून कार्यान्वित
छत्रपती संभाजीनगर,
दि.३०(जिमाका)-जिल्ह्यातील
मुख्य अभियंता मृद व जलसंधारण हे कार्यालय गुरुवार दि.२ जुलै पासून कार्यान्वित होणार
आहे.मुख्य अभियंता म्हणून हरिभाऊ गिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात
मृद व जलसंधारण विभागाच्या दि.२७ मे च्या शासन निर्णयानुसार मुख्य अभियंता मृद व जलसंधारण
छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यालयाचे
कार्यक्षेत्र छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागातील ८ तसेच नाशिक प्रादेशिक विभागातील
५ असे एकूण १३ जिल्ह्यांचे असणार आहे.या कार्यालयाचे पहिले मुख्य अभियंता म्हणून हरिभाऊ
गिते यांची करण्यात आली आहे.आयुक्त मृद व जलसंधारण यांनी त्यांचेकडे हा पदभार देण्यात
आला आहे. वाल्मी परिसर, कांचन वाडी, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे हे कार्यालय
दि.२ जुलै पासून कार्यान्वित होईल. या कार्यालयाचे उद्घाटन दि.२ जुलै रोजी दुपारी १२
वा. होणार आहे,असे प्रादेशिक दक्षता व गुणनियंत्रण अधिकारी, दक्षता व गुण नियंत्रण
पथक (मृद व जलसंधारण) छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे.
०००००
Comments
Post a Comment