‘अमृत’ तर्फे लोकसेवा आयोग परीक्षा मार्गदर्शन; ऑनलाईन अर्ज मागविले

 



 

छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)- महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तसेच अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांसाठी संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षा व मुलाखत पूर्वतयारीसाठी प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य योजना सन २०२६-२७मध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

अमृतच्या लक्षित गटामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुंथर, गुजराती, जाट, हिंदू नेपाळी, भूमिहार, लोहाणा, कानबी आदी समाजघटकांचा समावेश आहे.

सन २०२६-२७ मध्ये संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा-२०२६मध्ये उत्तीर्ण झालेल्या व या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संकेतस्थळावरिल संबंधित सूचना काळजीपूर्वक वाचून त्यानुसार ऑनलाइन अर्ज भरावा. योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी रुपये ५० हजार इतके प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तसेच मुलाखत पूर्वतयारीसाठी रुपये २५ हजार इतके अर्थसहाय्य प्रदान करण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी अमृतच्या https://mahaamrut.org.in/याअधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. योजनेबाबतची सर्व माहिती, सूचना व अद्यतने अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत अडचण अथवा शंका असल्यास संबंधित जिल्हा अमृत कार्यालयाशी 7391065475 / 9403200606 यावरती संपर्क साधावा. असे आवाहन अमृत जिल्हा कार्यालय यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क पत्ता:- विभागीय व जिल्हा कार्यालय अमृत, पुंडलिक नगर रोड, सेक्टर -४ सिडको, हनुमान नगर पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर-:४३१००९  

00000

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा