छत्रपती संभाजीनगरला मराठी भाषा विकास केंद्र सुरु करणार-उद्योग मंत्री उदय सामंत

 







छत्रपती संभाजीनगर, दि. २४(जिमाका)-  मराठी भाषेच्या विकासासाठी शासन पुढाकार घेत असून छत्रपती संभाजीनगर येथे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मराठी भाषा विकास केंद्र  १० कोटी रुपये खर्चून सुरु करीत आहे,अशी घोषणा राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज मराठी भाषा विभागाच्या वतीने आढावा बैठक व साहित्यिकांसमवेत संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आ. विलास भुमरे, ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, भाषा संचालनालयाचे संचालक अरुण गिते आदी उपस्थित होते.

साहित्यिक विऱा. राठोड,गुलाबराव मगर आदी मान्यवरांनी आपले विचार मांडले. मान्यवर व्यक्तिंचे विचार ऐकल्यानंतर श्री. सामंत म्हणाले की, मराठी भाषेचा संस्कार हा घरातूनच व्हायला हवा. आपण लहान मुलांना मम्मी- पप्पा ऐवजी आई बाबा म्हणायला शिकवायला हवे. शासनाच्या पातळीवर आता प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा कार्यालय सुरु करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात हे कार्यालय असेल एक स्वतंत्र मराठी भाषा अधिकारी असेल.  हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने छत्रपती संभाजीनगर येथे मराठी भाषा विकास केंद्र सुरु करण्यात येईल. त्यासाठी १० कोटी रुपये खर्चण्यात येतील.त्यासोबतच पुस्तकांचे गाव, कवितांचे गाव असे उपक्रम साहित्यिकांच्या गावी राबविवून त्यांच्या स्मृती जागविण्यात येतील. युवा साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन, बाल साहित्य संमेलन अशा संमेलन उपक्रमांना चालना देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन बेहाडे यांनी केले.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा