'नशामुक्त भारत, मेरा युवा भारत'; जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर,
दि.२८(जिमाका)-
युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली 'मेरा युवा
भारत' (MY Bharat) छत्रपती संभाजीनगरच्या वतीने 'नशामुक्त युवा फॉर विकसित भारत' या
राष्ट्रीय अभियानांतर्गत जिल्हास्तरीय सृजनशील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही
स्पर्धा ३० जुलै २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता देवगिरी महाविद्यालयात होणार असून, यात
युवक-युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात
आले आहे.
भारताला व्यसनमुक्त आणि विकसित राष्ट्र
बनविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने सुरू केलेल्या या अभियानाद्वारे युवकांमध्ये
जनजागृती निर्माण करणे, सामाजिक उत्तरदायित्वाची भावना वाढीस लावणे आणि कला-साहित्याच्या
माध्यमातून व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य
हेतू आहे.
या स्पर्धेमध्ये विविध कलाप्रकारांचा
समावेश करण्यात आला असून, स्पर्धकांना आपल्या सृजनशीलतेद्वारे विचार मांडण्याची संधी
मिळणार आहे, चित्रकला आणि घोषवाक्य लेखन,नृत्य, संगीत आणि पथनाट्य,भाषण आणि रील निर्मिती
तसेच मुक्तछंद काव्य सादरीकरण (स्लॅम पोएट्री) याचा समावेश आहे.
स्पर्धेसाठी व्यसनमुक्ती, निरोगी
जीवनशैली, सामाजिक जबाबदारी आणि विकसित भारत निर्मितीत युवकांची भूमिका. या विषयावर
सहभाग घ्यावा. १५ ते २९ वर्ष वयोगटातील सर्व युवक युवती वैयक्तिक किंवा गट स्वरूपात
या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ शकतात.
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये,
शैक्षणिक संस्था, युवक मंडळे आणि इच्छुक युवक-युवतींनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग
नोंदवावा, संपर्कासाठी ८६९८१६४८२२या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.तसेच ईमेल द्वारे
देखील सहभाग बाबत संपर्क साधू शकता.mybharatchhsambhajinagar@gmail.com यांवर मेल करावा
असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी मेघा सनवाल
यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
00000
Comments
Post a Comment