बेवारस मयत; ओळख पटविण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, दि.
२५(जिमाका)- येथील पंचवटी समोर उड्डाणपुलावर दि.१३ रोजी मोटार सायकल अपघातात जखमी झालेल्या इसमाचे उपचार
घेतांना घाटी रुग्णालयात दि/१८ रोजी निधन झाले. या बेवारस इसमाने स्वतःचे नाव संजय
बनसोडे असे सांगितले आहे. त्याची ओळख पटविण्याचे आवाहन वेदांत नगर पोलिसांनी केले
आहे,.
पंचवटी समोर उड्डाणपुलावर गुरुवार दि.१३ रोजी दुपारी ३ वा ४० मि. च्या सुमारास मोटार
अपघातामध्ये जखमी झालेल्या एका
व्यक्तिस अंकुश मगरे यांनी घाटी रुग्णालयात दाखल केले.
दाखल केल्यावर जखमी व्यक्तीने
त्याचे नाव संजय बनसोडे (वय अंदाजे ३० वर्षे) असे सांगितले. त्यानंतर तो बेशुद्ध
झाला. उपचारा दरम्यान दि.१८ रोजी त्यास मयत घोषीत करण्यात आले. मयत
इसमाचे कोणीही नातेवाईक वा ओळखीचे व्यक्तिंनी संपर्क केलेला
नाही. त्यामुळे त्याची ओळख पटविण्याचे आवाहन वेदांत
नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी
केले आहे.
मयताचे वर्णनः वय अंदाजे ३० वर्षे, रंग काळा-सावळा, नाक-सरळ, डोळे-खोल, केस-काळे, चेहरा लांबट, अंगात कपडे- रुग्णालयातील कपडे, उंची
साधारण ५.२ फुट.
वरील वर्णनाच्या
इसमाबाबत काही माहिती कळाल्यास वेदांत नगर पोलीस स्टेशनचे पोउपनि
यांच्याशी अथवा ०२४०-२३५१३३३ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
०००००

Comments
Post a Comment