जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद शनिवारी (दि.२९)

 

छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका)- उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढावी यासाठी गुंतवणूकदार, व्यावसायिक यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन शनिवार दि.२९ रोजी करण्यात आले आहे. ही परिषद शनिवार दि.२९ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वा. पर्यंत हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे होणार आहे.

            जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद २०२६ च्या अध्यक्षस्थानी राज्याचे सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट हे राहणार असून विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी या परिषदेत प्रमुख उपस्थिती असेल.

            जिल्ह्यात ऑटोमोबाईल, इंजिनिअरींग उद्योग तसेच कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग व हिमरु शाल, वस्त्रोद्योग अशा विविध उद्योगांचे महत्त्वाची केंद्र आहेत. स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणे, निर्यातदारांसाठी सुविधा निर्माण करणे, नवीन उद्योग, गुंतवणूक आकर्षित करणे इ. या परिषदेचे उद्दिष्ट आहेत. त्यादृष्टिने चर्चा, विचार विनिमय, सामंजस्य करार इ. उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

            जिल्ह्यातील उद्योजक, उद्योजक संघटनांचे प्रतिनिधी, शेती उत्पादक संस्था, नव उद्योजक यांनी या परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या उपायुक्त श्रीमती करुणा खरात यांनी केले आहे.

 

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा