श्रीक्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखडा पुरातत्व विभागाच्या सूचनांनुसार विकास कामे करा-बी. वेणूगोपाल रेड्डी
छत्रपती संभाजीनगर, दि. २७(जिमाका)-
श्रीक्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखड्यानुसार विकास कामे करतांना पुरातत्व
विभागाने केलेल्या सूचनांनुसार करावी. तसेच स्थानिक राहिवासी, दुकानदार आणि यात्रेकरू
अशा सर्व घटकांना सर्वसमावेशक ठरेल अशी अंमलबजावणी करावी, असे निर्देश अपर मुख्य सचिव
बी. वेणूगोपाल रेड्डी यांनी आज येथे दिले.
श्रीक्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग
विकास आराखडा अंमलबजावणी संदर्भात आज आढावा घेण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाच्या व्यवस्थापन समिती सभागृहात घेण्यात आला.
मुख्य निवडणूक अधिकारी
पी. चोकलिंगम, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., पुरातत्व विभागाचे सह संचालक अनिल तिवारी,
उपसंचालक सुब्रह्मण्यम, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता
अग्निहोत्री,जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, अधीक्षक
अभियंता एस. एस. भगत, कार्यकारी अभियंता स्मिता पवार, जिल्हा सह आयुक्त न. प. प्रशासन
सौरभ जोशी तसेच वन विभाग आदी अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत माहिती देण्यात
आली की, आराखड्याप्रमाणे सुरु असलेल्या कामातील भक्तनिवास, शॉपिंग सेंटर, भक्त मार्गिका,
दर्शन बारी, पार्किंग, दर्शन बारी साठी अंडर पास इ. कामे गतीने सुरु आहेत. त्यातील
काही कामे ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होतील. अंडर पास साठीचे सीमांकन पुरातत्त्व विभागाकडून
करून देण्यात आले आहे.
श्री. रेड्डी यांनी निर्देश
दिले की, निर्माण होत असलेल्या सुविधा ह्या सर्वसमावेशक असाव्या. मंदिर परिसरातील दुकानदार,
स्थानिक राहिवासी यांना सुविधा जनक वाटावे असे नियोजन असावे. येणारे यात्रेकरू जे भक्त
असतील किंवा पर्यटक या सगळ्यांना सुकर वाटावी, अशी सुविधा निर्मिती व्हावी. परिसरातील
महादेव वन, लेणी आणि मंदिर परिसराला जोडणाऱ्या ह्या सुविधा असाव्यात. जेणेकरून येणारे
पर्यटक सर्व भागांना भेटी देऊ शकतील.
जिल्हाधिकारी गौडा यांनी
सांगितले की, या विकास आराखड्याची अंमल बजावणी करतांना पुरातत्व विभागाने केलेल्या
सूचनांचा पूर्ण अंतर्भाव करण्यात येईल. तसेच सर्व घटकांना सामावून घेण्यात येईल. तसेच
बफर झोन मध्ये संबंधित विभागाच्या अभिप्रायानंतर निर्णय घेण्यात येईल. तसेच घन कचरा
व्यवस्थापन संदर्भात उपाययोजना अंमलबजावणीबाबत प्रयत्न सुरु आहेत, असेही त्यांनी सांगितले.
00000







Comments
Post a Comment