सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत महिलांच्या कार्यशाळेत आरोग्य शिबिर 154 महिलातपासणी..
खुलताबाद : माननीय तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समाधान राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत पंचायत समिती कार्यालय, खुलताबाद येथे महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेदरम्यान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
पंचायत समिती व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या वतीने महिलांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस मा. तहसिलदार साहेब व पंचायत समितीमधील अधिकारी / कर्मचारी तसेच इतर नागरिक उपस्थित होते.
यावेळी मा. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समाधान राऊत सर यांनी स्वच्छता, संसर्गजन्य आजार तसेच इतर आजारांबाबत माहिती दिली. तसेच आजारांपासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी, आरोग्यविषयक उपाययोजना आणि विविध शासकीय आरोग्य योजना व उपलब्ध आरोग्य सुविधांबाबत मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या ठिकाणी आयोजित आरोग्य शिबिरामध्ये उपस्थित महिलांची रक्तदाब (BP), रक्तातील साखर (शुगर/डायबिटीस) तसेच आवश्यक रक्त तपासण्या करण्यात आल्या. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार व गोळ्या देण्यात आल्या.
‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत महिलांच्या कार्यशाळेच्या माध्यमातून आरोग्य तपासणी, रक्त तपासणी, मोफत औषधोपचार, आरोग्य जनजागृती व आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
या आरोग्य शिबिरामध्ये UHWC/HBT आपला दवाखाना येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत राठोड, डॉ. चेतना सूर्यवंशी, आरोग्य सेवक भगवान गाडेकर व HLL पवन पाटील उपस्थित होते.

Comments
Post a Comment