रोजगार महाकुंभ दि.२९ रोजी; जिल्ह्यात २१ ठिकाणी भरती मेळावे
छत्रपती संभाजीनगर , दि.१२(जिमाका)- राज्यातील युवकांना रोजगार , स्वयंरोजगार , कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने “ रोजगार महाकुंभ महाराष्ट्र २०२६ ” हा उपक्रम संपूर्ण राज्यात मंगळवार दि.२९ रोजी आयोजीत करण्यात आला आहे. या उपक्रमात अधिकाधिक युवक- युवतींनी सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा कौश ल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त . राजु वाकुडे यांनी केले आहे. या उपक्रमांतर्गत राज्यभर एकाच दिवशी ८०० रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ही मंगळवार दि.२९ रोजी आसावा ब्रदर्स कॉमर्स कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय , सिडको , सीएसएमएसएस (CSMSS) छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय , पैठण रोड , एमआयडीसी कौशल्य विकास केंद्र , शेंद्रा एमआयडीसी , सीएसएमएसएस (CSMS...

Comments
Post a Comment