लोकसंवाद’ आणि ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अंतर्गत

  

जिल्ह्यात आतापर्यंत ५५ हजार रुग्णांची तपासणी



छत्रपती संभाजीनगर, दि.२१(जिमाका)- मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे श्री गणेशा आरोग्याचा अभियान राबविण्यात येत आहे. त्यासोबतच जिल्हा माहिती कार्यालयाचा ‘लोकसंवाद’ उपक्रमही राबविण्यात येत आहे. आरोग्य तपासणी व आरोग्य विषयक योजनांची माहिती या शिबिरांमध्ये दिली जाते.

या  अभियानांतर्गत आतापर्यंत १००४ आरोग्य शिबिरे घेण्यात आली असून एकूण ५५७९३ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये २१,३१७ पुरुष, २४,८९१ महिला व ९५८५ बालकांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाद्वारे सुरू असलेल्या या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, शहरी आरोग्य आयुक्तालय, स्थानिक स्वराज्य संस्थांची आरोग्य यंत्रणा तसेच धर्मादाय रुग्णालयांतील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली. यानिमित्त ‘लोकसंवाद’ उपक्रमाद्वारे उपस्थित वैद्यकीय अधिकारी आलेल्या भाविकांना शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती देत असून त्याद्वारे लोकांना आरोग्य विभागाच्या योजनांची माहितीही उपलब्ध होत आहे. आयुष्मान कार्ड, महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजना, माता बाल संगोपन योजना अशा विविध योजनांची माहिती दिली जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व कक्षप्रमुख रामेश्वरजी नाईक यांच्या मार्गदर्शनातून सुरू झालेला ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम यंदा अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे गणेश मंडळांच्या मंडपाखालीच नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळत असून, आरोग्य तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

नागरिकांनी या उपक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय 

Comments

Popular posts from this blog

रोजगार महाकुंभ दि.२९ रोजी; जिल्ह्यात २१ ठिकाणी भरती मेळावे

छत्रपती संभाजीनगर विभागात दि.२९ रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ

गणेशोत्सवातील उत्कृष्ट सार्वजनिक मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा