ड्रोनसह हवाई उपकरणांच्या उड्डाणास प्रतिबंध
छत्रपती संभाजीनगर, दि. २८ (जिमाका) -कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच संभाव्य घातपाती कारवायांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरामोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स, हॉट एअर बलून आदींच्या उड्डाणास दि. २८ सप्टेंबर ते २६ नोव्हेंबर याकालावधीत प्रतिबंध करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त तथा कार्यकारी दंडाधिकारी प्रवीण पवार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये हे आदेश जारी केले आहेत. पोलिसांकडून करण्यात येणारी हवाई पाळत तसेच पोलीस आयुक्तांच्या विशिष्ट परवानगीने होणाऱ्या उड्डाणांना यातून वगळण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
०००००
Comments
Post a Comment