सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत महिलांच्या कार्यशाळेत आरोग्य शिबिर; १५४ महिलांची तपासणी
छत्रपती संभाजीनगर ( जिमाका ), दि. २३ : ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत पंचायत समिती कार्यालय, खुलताबाद येथे महिलांसाठी आयोजित कार्यशाळेदरम्यान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समाधान राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेस मा. तहसीलदार, पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समाधान राऊत यांनी स्वच्छता, संसर्गजन्य आजार तसेच विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच आरोग्यविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना, विविध शासकीय आरोग्य योजना आणि नागरिकांसाठी उपलब्ध आरोग्य सुविधांची माहिती देण्यात आली.
कार्यशाळेच्या ठिकाणी आयोजित आरोग्य शिबिरामध्ये एकूण १५४ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये महिलांची रक्तदाब (BP), रक्तातील साखर (शुगर/मधुमेह) तसेच आवश्यकतेनुसार विविध रक्त तपासण्या करण्यात आल्या. तपासणीदरम्यान आढळलेल्या आरोग्यविषयक बाबींनुसार आवश्यक सल्ला देण्यात आला. तसेच पात्र लाभार्थींना मोफत औषधोपचार व औषधांचे वितरण करण्यात आले.
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून महिलांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यासोबतच आरोग्य तपासणी, रक्त तपासणी, मोफत औषधोपचार, आरोग्य जनजागृती आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
या आरोग्य शिबिरामध्ये UHWC/HBT आपला दवाखाना येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत राठोड, डॉ. चेतना सूर्यवंशी, आरोग्य सेवक भगवान गाडेकर तसेच HLL पवन पाटील यांनी सहभाग घेऊन आरोग्य तपासणी व आरोग्यसेवा प्रदान केली.
Comments
Post a Comment