आयुष्मान आरोग्य मंदिर, खामगाव येथे ‘सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ

 


छत्रपती संभाजीनगर, दि. २८ (जिमाका) : ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत फुलंब्री तालुक्यातील आयुष्मान आरोग्य मंदिर, खामगाव येथे अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

अभियानाचे उद्घाटन गावातील प्रतिष्ठित नागरिक मोईन चांद शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी खामगावचे सरपंच सोमीनाथ पाटील सोनवणे, उपसरपंच मनोहर सोनवणे यांच्यासह गावातील मान्यवर उपस्थित होते.

समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. साजिद शेख यांनी ‘सेवा संकल्प अभियानाचा’ उद्देश, नागरिकांसाठी उपलब्ध आरोग्य सेवा तसेच अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती दिली.

अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक व आवश्यक आरोग्य सेवा नजीकच्या आरोग्य संस्थेत उपलब्ध करून देण्यासह आरोग्यविषयक जनजागृतीवर विशेष भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आरोग्य सेविका सुरेखा पाटील, आरोग्य सेवक सुनील गांधिले, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

रोजगार महाकुंभ दि.२९ रोजी; जिल्ह्यात २१ ठिकाणी भरती मेळावे

छत्रपती संभाजीनगर विभागात दि.२९ रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ

गणेशोत्सवातील उत्कृष्ट सार्वजनिक मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा