सेवा संकल्प अभियान:जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम
छत्रपती संभाजीनगर, दि. २४ (जिमाका) -‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पात्र विद्यार्थी व अर्जदारांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य संगीता मकरंद यांनी केले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेले तसेच इयत्ता १२ वी नंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, विधी आदी अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. यासह सेवा, निवडणूक व अन्य कारणांसाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या अर्जदारांनाही या मोहिमेचा लाभ घेता येणार आहे.
इच्छुक अर्जदारांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी https://ccvis.barti.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावा. ऑनलाइन अर्जाची प्रत आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयात तातडीने जमा करावी. प्राप्त अर्जांवर समितीकडून तात्काळ कार्यवाही करून पात्र अर्जदारांना ऑनलाइन पद्धतीने जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येणार असल्याचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने कळविले आहे.
Comments
Post a Comment