भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगर, दि. २९ (जिमाका) : ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ अंतर्गत अंभई मंडळातील वसंतराव नाईक आश्रम शाळा, शिरसाळा तांडा येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरामध्ये विमुक्त जाती व भटक्या जमातीतील नागरिकांना विविध शासकीय योजना, हक्क तसेच आवश्यक प्रमाणपत्रांबाबत माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. संबंधित विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नागरिकांना आवश्यक सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य केले.
यावेळी पुरवठा अधिकारी बळीराम मुंडे, दुय्यम निबंधक सिल्लोड कार्यालयाचे प्रतिनिधी, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे निरीक्षक संतोष वाघ, कृषी सहाय्यक अधिकारी, मंडळ अधिकारी विजय शेळके, ग्राम महसूल अधिकारी अजित बनसोडे, विपुल संतापे, प्रशांत पारद्ये, निलेश देशमुख, कृष्णा देशमुख, अंभई केंद्रप्रमुख, शिरसाळा तांडा ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
तसेच महा-ई-सेवा केंद्र अंभईचे संजय भगुरे, आरोग्य उपकेंद्रातील अधिकारी-कर्मचारी, बीट पर्यवेक्षिका, आधार केंद्र आमठाणाचे भास्कर पारडे यांच्यासह विविध विभागांचे कर्मचारी व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.
Comments
Post a Comment