अल्पवयीन मुलगी बेपत्ता; माहिती देण्याचे आवाहन

 

छत्रपती संभाजीनगर, दि. २४ (जिमाका)-वाळूज येथील अविनाश कॉलनीतील राधिका बाळू वाघ (वय १६) ही दि. १६ सप्टेंबर रोजी रात्रीपासून बेपत्ता आहे. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४१८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राधिका हिचा रंग गोरा, उंची ४ फूट ७ इंच, बांधा मध्यम, चेहरा गोलाकार, केस काळे व मध्यम लांबीचे आहेत. बेपत्ता होताना तिच्या अंगात काळ्या रंगाचा शर्ट व ग्रे रंगाची जीन्स पॅन्ट होती. ती मराठी बोलते.

राधिका हिच्याबाबत कोणाला माहिती मिळाल्यास वाळूज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील एस. बोडखे यांच्याशी मो. क्र. ७०२००६०८७७ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

रोजगार महाकुंभ दि.२९ रोजी; जिल्ह्यात २१ ठिकाणी भरती मेळावे

छत्रपती संभाजीनगर विभागात दि.२९ रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ

गणेशोत्सवातील उत्कृष्ट सार्वजनिक मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा