निवृत्तीवेतनधारकांसाठी Maha-UPLABDHI’ मोबाईल ॲप; दि.६ ऑक्टोंबर रोजी कार्यशाळा


छत्रपती संभाजीनगर दि.२९(जिमाका)- लेखा व कोषागारे संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि वरिष्ठ कोषागार कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी तसेच निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘Maha-UPLABDHI’ मोबाईल ॲपबाबत मंगळवार दि.६ ऑक्टोंबर रोजी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा दहा ते दु.२ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. कार्यशाळेत ‘Maha-UPLABDHI’ मोबाईल ॲपचा वापर व त्यासंदर्भातील आवश्यक बाबींविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी तसेच निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या कार्यशाळेस उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ कोषागार कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.       

०००००

Comments

Popular posts from this blog

रोजगार महाकुंभ दि.२९ रोजी; जिल्ह्यात २१ ठिकाणी भरती मेळावे

छत्रपती संभाजीनगर विभागात दि.२९ रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ

गणेशोत्सवातील उत्कृष्ट सार्वजनिक मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा