वीर परिवार सहायता योजना ; माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना लाभ घेण्याचे आवाहन.



छत्रपती संभाजीनगर, दि. २९ (जिमाका) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या (NALSA) अंतर्गत वीर परिवार सहायता योजना २०२५ राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना विविध कायदेशीर प्रकरणांमध्ये विनामूल्य कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


या योजनेच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात लीगल सर्व्हिस क्लिनिक स्थापन करण्यात आले आहे. या माध्यमातून माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना कायदेशीर अडचणींचे निराकरण करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व विनामूल्य कायदेशीर सहाय्य मिळणार आहे.


योजनेअंतर्गत फौजदारी प्रकरणे, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाशी (MAT) संबंधित प्रकरणे, सशस्त्र सेना न्यायाधिकरणातील (AFT) प्रकरणे तसेच उच्च न्यायालयातील (HC) प्रकरणांसाठी विनामूल्य कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


तरी, संबंधित प्रकरणांमध्ये कायदेशीर मदतीची आवश्यकता असलेल्या सर्व माजी सैनिकांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन लेफ्टनंट कर्नल शरद पांढरे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

रोजगार महाकुंभ दि.२९ रोजी; जिल्ह्यात २१ ठिकाणी भरती मेळावे

छत्रपती संभाजीनगर विभागात दि.२९ रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ

गणेशोत्सवातील उत्कृष्ट सार्वजनिक मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा