महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन.
छत्रपती संभाजीनगर, दि. २६ (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महर्षी वाल्मिकी यांच्या महान कार्याचे, साहित्यिक योगदानाचे तसेच भारतीय संस्कृती आणि साहित्यविश्वातील त्यांच्या महत्त्वपूर्ण स्थानाचे स्मरण करण्यात आले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment