सुशिक्षित बेरोजगारांनी जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेसाठी अर्ज करावेत

 


छत्रपती संभाजीनगर, दि. २६ : जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी उद्दिष्ट प्राप्त झाले असून, पात्र सुशिक्षित बेरोजगारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे उप आयुक्त (उद्योग व सेवा) यांनी केले आहे.


या योजनेअंतर्गत अर्जांचे वाटप व स्वीकारण्याची प्रक्रिया दि. ११ मे २०२६ पासून सुरू आहे. प्राप्त अर्जांमधील पात्र कर्ज प्रकरणे बँकांकडे शिफारशीसाठी पाठविण्यात येणार आहेत.


अर्ज वाटप व स्वीकारण्याची अंतिम तारीख दि. ३० नोव्हेंबर २०२६ असून, अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत आहे. तरी इच्छुक सुशिक्षित बेरोजगारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

रोजगार महाकुंभ दि.२९ रोजी; जिल्ह्यात २१ ठिकाणी भरती मेळावे

छत्रपती संभाजीनगर विभागात दि.२९ रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ

गणेशोत्सवातील उत्कृष्ट सार्वजनिक मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा