‘अमृत’चे सेवा संकल्प अभियान

 


छत्रपती संभाजीनगर, दि.१२(जिमाका)- नागरिकांना आवश्यक दाखले सहज मिळावेत, यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) आणि यशस्वी उद्योजिका समूह यांच्या वतीने पुंडलिकनगर येथे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विशेष शिबिर घेण्यात आले. या शिबिराला परिसरातील महिला आणि नागरिकांनी सहभाग नोंदवला.    या उपक्रमात नागरिकांना उत्पन्नाचा दाखला, नॅशनॅलिटी-डोमेसाईल दाखला तसेच इतर आवश्यक शासकीय कागदपत्रे काढून देण्यासाठी मदत करण्यात आली. दाखले काढताना लागणारी कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि इतर माहितीही नागरिकांना समजावून सांगण्यात आली. जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे तसेच यशस्विनी उद्योजिका समूहाच्या अध्यक्ष विजया कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. मंजू कुलकर्णी यांनी उपस्थित महिलांना अमृतच्या विविध योजना, उपक्रम आणि प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यामुळे शासकीय दाखल्यांसोबतच महिलांना रोजगार, व्यवसाय आणि प्रशिक्षणाच्या संधींचीही माहिती मिळाली. शासकीय कागदपत्रे काढून देण्यासाठी गणेश दसरे, साई मल्टी सर्विसेस यांनी विशेष सहकार्य केले. तसेच रामेश्वर साळुंखे आणि यशस्विनी उद्योजिका समूहाच्या गायत्री दसरे, मनिषा खडके, मनिषा कुलकर्णी, भारती चोबे, रोहिणी भाले, राधिका ठोसर, वर्षा जोशी, मृणालिनी गोस्वामी आणि विनया कुलकर्णी उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी संपर्क पत्ता:- विभागीय व जिल्हा कार्यालय अमृत, पुंडलिक नगर रोड,सेक्टर -४ सिडको, हनुमान नगर पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर-४३१००९

संपर्क:- 7391065475 /  94032 00606

अमृत संस्थेचे संकेतस्थळ https://mahaamrut.org.in/

Comments

Popular posts from this blog

रोजगार महाकुंभ दि.२९ रोजी; जिल्ह्यात २१ ठिकाणी भरती मेळावे

छत्रपती संभाजीनगर विभागात दि.२९ रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ

गणेशोत्सवातील उत्कृष्ट सार्वजनिक मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा