जिन्सी पोलीस ठाण्यातील ५२ बेवारस दुचाकी वाहनांचा ३० ऑक्टोबर रोजी लिलाव
छत्रपती संभाजीनगर, दि. २९ (जिमाका) : जिन्सी पोलीस ठाणे, छत्रपती संभाजीनगर शहर येथे विविध कंपन्यांची एकूण ५२ बेवारस दुचाकी वाहने जमा आहेत. या वाहनांच्या मालकांनी वाहनांची ओळख पटवून आवश्यक मूळ कागदपत्रांसह पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा व आपली वाहने तीन दिवसांच्या आत परत घेऊन जावीत, असे आवाहन जिन्सी पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.
संबंधित वाहनधारकांनी जिन्सी पोलीस ठाणे, छत्रपती संभाजीनगर शहर येथे दूरध्वनी क्रमांक ०२४०-२२४०५५५ वर संपर्क साधावा. वाहनाची मालकी सिद्ध करणारी मूळ कागदपत्रे सादर करून वाहन ताब्यात घ्यावे.
विहित मुदतीत कोणीही वाहनांवर मालकी हक्क सिद्ध न केल्यास, नियमानुसार आवश्यक कार्यवाही करून दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी ५२ बेवारस दुचाकी वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित वाहनमालकांनी याची नोंद घेऊन विहित मुदतीत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment