महिला लोकशाही दिन सोमवारी (दि.१६)
छत्रपती संभाजीनगर, दि.१३(जिमाका)- महिलांना त्यांच्या समस्या, प्रश्न, अडीअडचणी मांडण्यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजीत केला जातो. या महिन्यात महिला लोकशाही दिन सोमवार दि.१६ रोजी आयोजीत करण्यात आला आहे.महिलांनी आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, शासकीय अर्जांविषयी , तक्रारी, अडीअडचणी असल्यास त्याबाबत विहित नमुन्यात अर्ज करुन आवश्यक कागदपत्रांसह सोमवार दि.१६ रोजी सकाळी ११ वा. जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन यांनी केले आहे.
०००००

Comments
Post a Comment