जायकवाडी कालव्यातून पाण्याचे आवर्तन; लाभक्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश

 


छत्रपती संभाजीनगर, दि.१३(जिमाका)- जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य डावा, उजवा कालवा व त्यांच्या वितरीका, लघु वितरीकांद्वारे शेतकऱ्यांना रब्बी हंगामा २०२६-२७ साठी आवर्तन सोडण्यात आले आहे.या कालवा प्रणालीच्या लाभ क्षेत्राट व आपेगाव उच्च पातळी बंधारा, हिरडपुरी उच्च पातळी बंधारा या क्षेत्रात दि.११ जानेवारी २०२७ पर्यंत कलम १६३(१) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी जनार्दन विधाते यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्याअन्वये सिंचन आवर्तनादरम्यान  कालव्यांमधुन होणारा अनधिकृत पाणी उपसा, कालव्याच्या नियंत्रण संचनेत हस्तक्षेप, कालवा व संबंधित बांधकामांचे नुकसान,  पाणी वाटपाच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करणे इ. कृत्य करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

रोजगार महाकुंभ दि.२९ रोजी; जिल्ह्यात २१ ठिकाणी भरती मेळावे

छत्रपती संभाजीनगर विभागात दि.२९ रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ

गणेशोत्सवातील उत्कृष्ट सार्वजनिक मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा